म.न.पा. क्षेत्रातील व्यवसाय दिवसातून ४ तास सुरू करण्यास परवानगी द्यावी : व्यापारी एकता असोसिएशन.

 म.न.पा. क्षेत्रातील व्यवसाय दिवसातून  ४ तास सुरू करण्यास परवानगी द्यावी : व्यापारी एकता असोसिएशन.


 


सांगली - जिल्ह्याची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, तसेच महापालिका सीमा सील करून म.न.पा. क्षेत्रातील व्यवसाय दिवसातून केवळ ४ तास सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी श्री.अभिजीत चौधरी यांचेकडे करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी या संदर्भात शासनाचे निर्देश आल्यानंतर ३ तारखेला परत बैठक घेउ आणि पुढील निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली असे श्री.समीर शहा यांनी सांगितले.



 त्यावेळी निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सांगली जिल्हा प्रशासनाने योग्य व कठोर नियोजन केल्याने सांगली जिल्ह्याची स्थिती नियंत्रणात आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत सध्या सांगली जिल्हा पूर्ण सुरक्षित आहे. गेल्या महिन्यापासून महापालिका क्षेत्रातील व्यवसाय बंद आहे. महापालिका क्षेत्रात या विषाणूचा प्रार्दूभाव नाही. महापालिका सीमा सील करून म.न.पा. क्षेत्रातील व्यवसाय दिवसातून केवळ ४ तास सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे .
व्यवसाय सुरू करण्याबाबतची मागणी असोसिएशनने पालकमंत्री जयंत पाटील यांना देखील केली आहे असे समीर शहा यांनी सांगितले.