आदिवासी कुटुंबाला मदतीचा हात.
भिलवडी - लोकडाऊन मुळे भिलवडी ता,पलूस येथे कोकणातून आलेले सुमारे 25 आदिवासी लोकांचे कुटुंब अडकून पडले आहे, भिलवडी येथील घनदाट बाभळीच्या रानात कोळसा तयार करण्यासाठी सदर लोक आले आहेत, परंतु मुकादम गावी असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली याची माहिती पत्रकार नितीन काळे यांनी सभापती विजय कांबळे यांनी दिली, त्यांनी पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल कुंदे पत्रकार भाऊसाहेब रुपट्टके यांच्या सहकार्याने या आदिवासी कुटुंबाना व शेजारीच असलेल्या हेळवी कुटुंबातील सुमारे वीस लोकांना धान्य ,साबण, मास्क याचे वाटप केले.
या वेळी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ, धेंडे व सहकारी यांनी या लोकांची आरोग्य तपासणी करून कोरोना विजयी जागृती केली ,स्वतःची स्वच्छता कशी राखावी याचे प्रात्यक्षिक दाखवले,
या वेळी पंचशील तरुण मंडळाचे कार्यकर्ते, खंडू कांबळे, मंथन कांबळे, रोहन कांबळे पप्पू कांबळे,महेश रांजणे, निमिन सुतार, अभिजित रुपट्टके उपस्थित होते