भिलवडी पत्रकार संघ यांच्या वतीने आरोग्य उपयोगी साहित्याचे किट वाटप.
भिलवडी - भिलवडी ता. पलूस येथील पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस स्टाफला भिलवडी पत्रकार संघ व स्वराज्य फौंडेशन धनगाव यांच्या वतीने आरोग्य उपयोगी साहित्याचे किट वाटप करण्यात आले.भिलवडी पोलीस बांधव कोरोनाच्या पर्शवभूमीवर अविरथपणे कार्यरत आहेत.संचारबंदी सोबत ही गावागावात जावून प्रबोधनही करीत आहेत.त्यांच्या सुरक्षित तेच्या दृष्टिकोनातून मास्क,सॅनिटाईझर,हॅन्डग्लोज असे साहित्य असणाऱ्या आरोग्यदायी किटचे वाटप करण्यात आले.जेष्ठ पत्रकार महावीर काका माद्वान्ना,स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता उतळे,सतीश तोडकर यांच्या हस्ते किट प्रदान करण्यात आले.भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग,पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप यांनी त्याचा स्विकार केला.यावेळी बोलताना कैलास कोडग म्हणाले की,पत्रकार आणि पोलीस यांच्या समन्वयातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगल्या प्रकारे समाज जागृती होत आहे.भविष्यातही असाच समन्वय ठेवून समाजासाठी चांगले काम करीत राहूया. भिलवडी पोलीस ठाण्यात कार्यरत पन्नास कर्मचा-यांना किटचे वाटप करण्यात आले.यावेळी शितलनाथ चौगुले,शरद जाधव,घनश्याम मोरे,चंद्रमणी रांजणे,संतोष उंडे,अशोक वंजारी,सचिन खाडे, रफिक मुलाणी,अतुल माळी आदी सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Attachments area