आशा वर्करच्या सुरक्षेसाठी  सरसावले राजेश नाईक फाउंडेशन .

आशा वर्करच्या सुरक्षेसाठी  सरसावले राजेश नाईक फाउंडेशन .


सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असणाऱ्या सांगली महापालिकेच्या आशा वर्कर यांना आज राजेश नाईक फाउंडेशन कडून सुरक्षितेसाठी मास्क,अँपरण आणि किट वाटप करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि माजी सभापती राजेश नाईक यांच्याहस्ते हे किट वितरित करण्यात आले आहे.
   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात घरोघरी जाऊन नागरिकांकडून महापालिकेच्या आशा वर्कर या आरोग्य विषयक माहिती गोळा करणे व इतर कामे करत आहेत. आणि या आशा वर्कर महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी सांगलीतील राजेश नाईक फाऊंडेशन सरसावले आहे.आज् फाउंडेशनच्या माध्यमातून महापालिकाकडे कार्यरत असणाऱ्या 60 अशा वर्कर कर्मचाऱ्यांना अँपरण ,मास्क ,हेड मास्क अश्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या वस्तू देण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या या युद्धात आशा वर्कर यांचे काम उल्लेखनीय असल्याने ,त्यांचा जीवाची काळजी घेण्याचा प्रयत्न हा आर.एन फाऊंडेशनकडून करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि माजी सभापती राजेश नाईक यांच्या हस्ते यावेळी या महिला कर्मचाऱ्यांना हे सुरक्षा किट तसेच रोजचे घरगुती किट ही देण्यात आले आहे. याप्रसंगी महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे, यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे,आर एन फौंडेशनचे अध्यक्ष संदीप आपटे,नंदकुमार कारंडे, अशोक मुळीक, मधुकर सुर्यवंशी, जितुभाई शहा,नंदकुमार मुळीक,अनिल नाईक,उदय नाईक, विश्वास केसरे,राहुल मुळीक,नितीन गायकवाड,दीपक ताटे,अनिल मुळीक, धनंजय भोर,किरण नाईक,सतिश कलगुटगी,रोहन आपटे,रोहित मुळीक, व्यंकटेश नाईक,विराज नाईक आदी उपस्थित होते.यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी राजेश नाईक फाउंडेशनने आशा वर्कर महिलांच्या प्रति दाखवलेली बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे सांगत ,आर एन फाउंडेशनचे आभार मानले आहेत.