नांद्रे, कर्नाळ, पद्माळे गावात मास्क,  सॅनिटायझरचे वाटप आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचा उपक्रम 

नांद्रे, कर्नाळ, पद्माळे गावात मास्क, 
सॅनिटायझरचे वाटप आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचा उपक्रम



सांगली, ता. 27 : सांगली विधानसभा मतदार संघातील नांद्रे, कर्नाळ आणि पद्माळे या गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि जंतूनाशक फवारणीचे औषध वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीनही ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गर्दीमुळे संसर्ग होऊ नये यासाठी मास्क घालूनच फिरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली मतदार संघातील नांद्रे, कर्नाळ आणि पद्माळे या गावांना भेट दिली. तेथे ग्रामपंचायती मध्ये जाऊन गावातील परिस्थितीची माहिती घेतली. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर आणि जंतूनाशक फवारणीचे औषध दिले. यावेळी आमदार गाडगीळ यांनी, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी  नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मास्क वापरावेत, हात सतत सॅनिटायझरने स्वच्छ करावेत. स्वच्छता ठेवावे व आपला बचाव करावा असे आवाहन केले. तसेच सरकार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे. या संकटावर आपण सर्वांनी एकजुटीने लढा देऊन मात करु असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी पद्माळेचे सरपंच सचिन जगदाळे,मिलिद पाटील विलास पाटील  कर्नाळ सरपंच मुमताज मुजावर, उपसरपंच राहुल कांबळे, गजानन पाटील, शिवाजी पाटील, केशव पाटील, विशाल वाघमोडे, चंद्रकांत पाटील, बाळकृष्ण मोहिते, नांद्रेचे सरपंच दिपाली नांद्रेकर, पंचायतसमिती उपसभापती राहुल सकळे, सुरेश पाटील, किरण पाटील, नेमगोंडा पाटील, मोसीन मुल्ला व आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचे विश्वजीत पाटील तसेच सर्व गावाचे तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते