संचारबंदी काळात अनिमल राहत ने संकटातील प्राण्यांना वाचवले

  • शहरातील भुकेल्या जीवांना राहत.
    संचारबंदी काळात अनिमल राहत ने संकटातील प्राण्यांना वाचवले


सांगली - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. यामुळे शहरातील सर्व हॉटेल, दुकान, खानावळ बंद झाल्याने भटक्या जनावरांवर देखील उपासमार होणार की काय असे वाटत होते, पण नेहमीच कसल्याही प्रकार च्या संकटातून जनावरांना वाचवण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या अनिमल राहत ने या संचारबंदी काळातही आपले कार्य चालूच ठेवले आहे. संचारबंदीत संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आत्ता पर्यंन्त ४५०० पेक्षा जास्त उपाशी कुत्र्यांना योग्य आहारा सोबत जंतनाशक औषध दिले, बरोबरचं उपास मारी मुळे अशक्त झालेल्या भटक्या गाई, घोडा, कुत्रा याना औषध उपचार करून बरे केले, तसेच शेखर- वाडी येते विहिरीत पडलेल्या म्हशीला ,शहरातील उपनगरांमध्ये मानवी वस्तीत चूकून आलेलं दोन इजाट (सिवेट कॅट), ४ नाग ,५ घोणस, ३ मण्यार असे विषारी साप ,वड्डी गावातील तस्करी होण्यापासून वाचवलेले म्हामडूल साप ,मिरजेतील तस्करी होण्यापासून वाचवलेली घोरपड,भोसे गावातील एकाच शेततळ्यात पडलेल्या एका घोणस आणि दोन टिटवी च्या पिल्लांना बाहेर काढुन सर्वाना निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा सुरक्षित सोडले आहे. टिटवी च्या पिल्लांना काही वेळातच त्यांचा आईने कुषीत घेतले.
अनिमल राहत मार्फत हे काम अविरत चालू आहे व त्या साठी दोन अनिमल अंबुलन्स ,डॉक्टर, वैद्यकीय सहायक, प्राण्यांचा संकटातून बचाव करणारे स्वयंसेवक अशी पंधरा जणांची टीम चोवीस तास कार्यरत आहे.