विठ्ठल चोरगे यांच्याकडून गरीब कष्टकरी जनतेस अन्नधान्याचे किट वाटप.

विठ्ठल चोरगे यांच्याकडून गरीब कष्टकरी जनतेस अन्नधान्याचे किट वाटप.  (पुणे प्रतिनिधी)कात्रज - सच्चाई माता मंदिर आंबेगाव परिसरात विठ्ठल भाऊ चोरगे च्या रूपाने खऱ्या अर्थाने वाली मिळाला असल्याची सच्याई माता परिसरातील नागरिकात चर्चा सच्याई माता मंदिर कात्रज आंबेगाव हा भाग नुकताच पुणे महानगर पालिकेच्या अखत्यारित आल्यामुळे ग्रामीण भागातून अनेक  नागरिकांचा येथे राहण्याचा कल असल्यामुळे   येथील अनेक कामगार कष्ट करीची लोक वस्ती वसलेली आहे. सध्या करोना सारख्या महामारी मुळे सर्वत्र लॉग डाऊन मुळे सर्वच कामकाज ठप्प झाले मुळे  अनेक मजूर,कामगाराचे हाल होऊ नये म्हणून आखिल दहीहंडी उत्सव समिती च्या वतीने दररोज ५० किट वाटप करण्यात येत आहे त्यामध्ये, गहू, पीठ,तांदूळ, गोडेतेल, दाली, चटणी अश्या जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांना मदतीचा हात देत आहेत.किमान त्या परिसरातील ७०० कुटुंबीयांना आम्ही सर्व मित्र मंडळीच्या सहकार्याने वाटणार असल्याचे विठ्ठल चोरगे यांनी पत्रकारांना सांगितले त्यावेळी डॉक्टर शिंदे , किरण चोर्घे, नितीन पवार, निखिल मोरया, आशिष राऊत , तेजस डांगी व मित्रपरिवार उपस्थित होते.