निराधार केंद्रात केले  तब्बल पाच टन कलिंगडाचे वाटप.

   निराधार केंद्रात केले  तब्बल पाच टन कलिंगडाचे वाटप.


सांगली - 

बळीराजा कडेच दानत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.  मिरज तालुक्यातील नरवाड येथील बाळासाहेब लिंबेकाई या शेतकऱ्याने तब्बल पाच टन कलिगडाचे वाटप पोलीस, सफाई कर्मचारी तसेच सावली निराधार केंद्रात बुधवारी केले सदर वाटप स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्याहस्ते करण्यात आले.

बाळासाहेब यांची 2 एकर कलिंगड आहेत,  या कलिंगडाची ते स्थानिक तसेच अन्य ठिकाणी विक्रीही करत आहेत मात्र सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी बुधवारी कलिंगडाचे वाटप केले पोलीस व सफाई कर्मचारी जीवावर उदार होवून कोरोना क्या युद्धात लढत आहेत. या लढणाऱ्या सैनिकांना  काही तरी मदत करावी या हेतूने कलिंगडाचे वाटप केल्याचे लींबेकाई यांनी सांगितले.   जिल्हा अध्यक्ष महेश खराडे म्हणाले कितीही अडचणी आल्या तरी बळीराजा सामाजिक बांधिलकीचे भान ठेवतो, कोरोना मुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे तरीही लढणाऱ्या सैनिकांसाठी तो धावून आला आहे सांगली शहरात बंदोबस्तासाठी असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी, काही सफाई कर्मचारी तसेच पत्रकार आणि आपटा पोलीस चौकी जवळ सुरू करण्यात आलेल्या निराधार केंद्रात वाटप करण्यात आले , यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, प्रा अजित हळीगळे ,सुरेश अडसास्ती, बतु चौगुले ,साहेबराव वाघमारे,  प्रकाश गिरी , आदीसह अन्य उपस्थित होते