आर.डी. ग्रुप व कुरुंदवाड भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शहरात मास्कचे वाटप.

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) -
        कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे ,तसेच विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, याचं पार्श्वभूमीवर आर.डी. ग्रुप व कुरुंदवाड भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शहरात मास्कचे वाटप करण्यात येत आहे. याची सुरुवात मंगळवारी प्रभाग 3 मधून करण्यात आली आहे यावेळी नगरसेवक उदय डांगे,कुमार कोरवी,दासू कुरणे,आण्णाप्पा निकम,शुभम जोंग आदी उपस्थित होते.