अखेर महाराष्ट्र शासनाने एसटी बसेस मधून ऊसतोड मजुरांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला.
कुरुंदवाड -
शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्याचा हंगाम संपून 15 दिवसांहून अधिक काळ लोटला मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीगवर सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे त्यांना आपल्या गावी परत जाता येत नव्हते काही ऊसतोड मजुरांनी जाण्याचा प्रयत्न केला पण शासनाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांची वाहने अडऊन त्यांना ते ज्या कारखान्यातून आलेत तेथे त्यांना परत पाठवण्यात आले त्यामुळे शेकडो ऊसतोड मजुरांना आपल्या गावी जाता आले नाही ते कारखान्यावरचं अडकून राहिले ते आपल्या घरी जाण्यासाठी विनवण्या करीत होते.
त्यांना अन्नधान्य पुरवठा साखर कारखाने आणि स्वयंसेवी संस्था करत होते मात्र या सर्व ऊसतोड मजुरांना गावाकडची ओढ लागली होती अखेर महाराष्ट्र शासनाने एसटी बसेस मधून त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार कुरुंदवाड आगाराने मंगळवारी कार्यशाळेतील पाठवण्यात येणाऱ्या 10 बसेस चे औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करून घेतले व शिरोळ येथील दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर असणाऱ्या बीड जिल्ह्यातील ऊस तोड व जोडणी मजुरांसाठी एसटी बसेस रवाना केल्या .
शासन निर्णयानुसार कुरुंदवाड आगारा मधून पाठवण्यात आलेल्या बसेसमध्ये एक चालक 23 प्रवासी याप्रमाणे बीड जिल्ह्यात त्या पाठवण्यात आल्या आहेत
या बसेस बीड जिल्ह्यातील राजुरी, भवनवाडी, सोनपेठ(2 एसटी बस). कारेगव्हाण ( 5 एसटी बसेस). फरीदाबाद, पाटोदा, जाधववाडी, आनंदवाडी ( 1 एसटी बस). बोरफडे बाबुळखुंटा, हिरवा पहाडी, वांगी, पिंपळनेर (1 एसटी बस). नारेवाडी, आंधळेवाडी, नानेवाडी, लिंबचेवाडी ( 1 एसटी बस). अशा प्रकारे या बसेसची विभागणी करून या बसेस पाठवण्यात आल्या.
एका बस मध्ये 1 वाहक व 23 प्रवाशी अशा दहा बसेसमधून 230 ऊसतोड मजूर एका फेरी मध्ये आपल्या बीड जिल्ह्यातील गावांमध्ये पोहोचणार आहेत.
अशाप्रकारे शिरोळ तालुक्यातील सर्वच ऊसतोड मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात येणार आहे सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना मास्क आवश्यक ती वैद्यकीय साहित्य देण्यात आले आहे.
लॉक डाऊन मुळे गेल्या एक महिन्यापासून कुरुंदवाड आगाराची एसटी सेवा बंद आहे त्यामुळे आज मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी तब्बल एक महिन्यानंतर ऊसतोड मजुरांसाठी लालपरी रस्त्यावरून धावली .
आपल्या कुटुंबासह सर्वच ऊसतोड मजुरांना आपल्या गावी जायला मिळणार याचा एक आकस्मिक आनंद सर्वच ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर दिसत होता.