भिलवडी पोलिसांची धडक कारवाई ९४ हजार रुपयांचा दंड वसूल.

  • भिलवडी पोलिसांची धडक कारवाई ९४ हजार रुपयांचा दंड वसूल.

  • संचारबंदीचा भंग करणे व तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्यांवर धडक कारवाई.



 भिलवडी - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लोक डाऊन घोषीत केला. या कालावधीत संचारबंदी ही लागू आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कामानिमित्त वावरताना तोंडाला मास्क घालण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. परंतु शासनाच्या या आदेशाची लोकांच्याकडून पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. अशा लोकांवर भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलास कोडग व पोलीस उपनिरिक्षक विशाल जगताप व पोलीस स्टाफने धडक कारवाई करीत गेल्या आठवडाभरात संचारबंदीचा भंग करणारे तसेच तोंडास मास्क न लावता फिरणाऱ्या तब्बल ४७ जणांवर  कारवाई केली असून, त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साो पलूस यांच्या न्यायालयात सदर लोकांकडून तब्बल ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढे देखील भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदीचा भंग करणारे, तोंडास मास्क न लावता सदर रोगाचा संक्रमण पसरविणेची हयगयीची कृती करणारे तसेच मोटर सायकलवरून एका व्यक्तीपेक्षा व चारचाकी वाहनातून दोन व्यक्तीपेक्षा जास्त लोकप्रवास करीत असताना आढळून आल्यास त्यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलास कोडग यांनी दिला असून नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून, घरीच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.