मुंबई येथे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे खेराडे वांगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर प्रशासनाने या व्यक्तीशी संबंधित ३० व्यक्तींना कडेगाव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवले होते. या व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
अंत्यसंस्काराला गेलेल्या 'त्या' ३० जणांचा अहवाल निगेटिव्ह.