लिंगायत बोर्डिंगमध्ये साधेपणाने बसव जन्मोत्सव.

 



लिंगायत बोर्डिंगमध्ये साधेपणाने बसव जन्मोत्सव.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांना फाटा  : जिल्ह्यातही घरीच बसवपूजन


सांगली -  (दि.26 एप्रिल ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये बसवेश्वर जयंतीच्या कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. कार्यालयातच साधेपणाने पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बसव जन्मकाळ व जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुधीर सिंहासने यांच्याहस्ते बसवपूजन करण्यात आले.
सकाळी बसवेश्वर जयंतीनिमित्त रुद्राभिषेक करण्यात आला. दुपारी 12 वाजता प्रतिमापूजन करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी जन्मकाळ पाळणा सादर केला.
याप्रसंगी उद्योजक प्रदीप दडगे, संचालक सुशील हडदरे, सचिव सुनील कोरे, सविता आरळी,  निळकंठ कोरे, रविंद्र केंपवाडे, योगेश कापसे, अनुपमा कोरे, विद्या झाडबुके, रुपा बोबडे, सुनील निंगनुरे, विजय हिंगमिरे, प्रसाद स्वामी, सुरेश स्वामी, शिवाजी बाळिगरे, माणिक माळी आदी उपस्थित होते.  संयोजन व्यवस्थापक सतीश मगदूम यांनी केले.
सांगलीतील गावभागात वीरभद्र मंदिरात जन्मोत्सव साधेपणाने साजरा केला. यावेळी रमेश दडगे, सुरेश बोळाज, अध्यक्ष महेश कोरे, अरुण बोळाज, प्रभाकर चुकारे, अ‍ॅड. अमोल बोळाज व पंचाक्षरी बोळाज आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे लॉकडाऊन व संचारबंदी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बसवेश्वर जयंतीचे कार्यक्रम साजरे करू नयेत, असे आवाहन करण्यात आले होते. त्याअंतर्गत मंडळे, नागरिकांनी साधेपणाने घरीच बसवपूजन करून जन्मोत्सव साजरा केला.