कोरोनाला धोबीपछाड. तब्बल २० वेळा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या वृद्धेची कोरोनाला धोबीपछाड !

कोरोनाला धोबीपछाड. तब्बल २० वेळा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह  आलेल्या वृद्धेची कोरोनाला धोबीपछाड !


   


तिरूअनंतपुरम - देशातील सर्वांत पहिली कोरोना केस केरळमध्ये सापडली. देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता २८ हजारांहून अधिक झाली आहे. केरळमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या ४६९ वर आहे. सर्वात पहिला कोरोनाचा रूग्ण सापडलेल्या केरळमध्ये स्थिती नियंत्रणात कशी आली हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान आणखी एक आश्चर्याचे वृत्त समोर आले आहे. तब्बल २० वेळा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येऊन सुद्धा एका ६५ वर्षाच्या वृद्धेने कोरोनावर मात केली आहे. 


गेल्या ४८ दिवसापासून ही वृद्ध कोरोनाविरोधात लढा देत होती. अखेर तिने या लढ्यात यश मिळवले आणि २४ एप्रिलला तिला डिस्चार्ज देण्यात आला. या वृद्ध महिलेच्या स्वॅबची २० वेळा टेस्ट करण्यात आली असून तिच्या २० ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. अखेर सलग दोन आठवड्यानंतर तिची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 


ही वृद्ध महिला मुळची पठाणमथिट्टा जिल्ह्यातील वडसेरकरा गावची आहे. प्रकृती बिघडल्याने तिला ८ मार्चला कोझेनचेरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची चाचणी केली असता निकाल पॉझिटिव्ह आला. ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्य इटलीहून केरळमध्ये आलेल्या एका कुटूंबाच्या संपर्कात आले होते. वृद्ध महिलेच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, ती लवकर बरी झाली. अशी माहिती वृद्धेने दिली. 


मृत्यूच्या दारातून मी घरी परतल्याने माझे कुटूंब खुप आनंदी आहे. तरीही मी रूग्णालयातून आल्याने मला पुढचे काही १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे. मी खुप नशीबवान आहे, डॉक्टर आणि परिचारिका माझ्यावर योग्य प्रकारे उपचार करत होते. रूग्णालयातीन कर्मचारी नेहमी दिलासा देत होते. राज्याचे आरोग्यमंत्री के.के. शैलजा हेदेखील माझ्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या संपर्कात होत्या असेही वृद्ध महिलेने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 


विशेष म्हणजे या वृद्ध महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारखे आजार होते. या आजारात  महिलेला उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी होती. परंतु तिला इतर कोणताही मोठा आजार नव्हता. 


तसेच, ती पुढे म्हणाली माझे पती आणि मुलगा दिल्लीत आहे. मात्र, मी रूग्णालयात दाखल झाले तेव्हा मला माझ्या घरी आहे असेच वाटले. विविध धर्माची लोक माझी प्रकृती बरी होण्यासाठी प्रार्थना करत होते. प्रकृती ठीक होण्यासाठी मन सकारात्म हव असेही ति यावेळी म्हणाली