बसवेश्वर जयंती अभिनव पद्धतीने साजरी.


  •  बसवेश्वर जयंती अभिनव पद्धतीने साजरी.


 


कुरुंदवाड  - येथे म.बसवेश्वर जयंती म.बसवण्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान,श्री अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ आणि समस्त लिंगायत समाजामार्फत अभिनव पद्धतीने साजरी करण्यात आली.
         कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जारी शासकीय आदेशांचा सन्मान राखून ही जयंती साजरी करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीने घेतला.आणि त्या निर्णयाचे पालन कुरुंदवाडच्या समस्त लिंगायत समाजाने करुन घरोघरी बसवप्रतिमेचे पुजन करण्यात आले.
            याचबरोबर  श्री कल्लेश्वर मंदिरात सर्वप्रथम श्री बसवमुर्तीचे पुजन करण्यात आले.त्यानंतर म.बसवेश्वर चौक येथील फलकाचे  पुजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला.
         आणि लॉकडाऊनच्या काळात कुरुंदवाड वासियांची अविरत सेवा करण्यासाठी धडपडणा-या कर्मचा-यांना फराळाचे वितरण करण्यात आले.यामध्ये पोलिस स्टाफ,कुरुंदवाड नगरपरिषदेचे सफाई कामगार,विद्युत मंडळ कर्मचारी, सरकारी दवाखान्यातील सहाय्यक,मदतनीस,व्हाईट आर्मी स्वयंसेवक,गरजू कुटुंबे आणि पत्रकार या सर्वांना फराळाची पाकिटे प्रतिष्ठान आणि समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोच केली. यामध्ये दिपक परीट,सुधाकर औरवाडे, सच्चिदानंद आवटी, मनोहर कोरे,दिपक आंबी, गणेश कुंभार, रघुनाथ माळी,दादा परीट, राजेंद्र चौगुले, ऋषिकेश चौगुले, किशोर खोत, शंकर मेंगे गुरुजी, सदाशिव मगदुम,शिवमुर्ती स्वामी,दुंडय्या स्वामी,शिवलाल चौगुले,राजगोंडा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमास समाजातील सर्व स्तरातील घटकांचे सहकार्य लाभले.
      फराळ वितरणानंतर दुपारी ठीक १२.००वाजता परंपरेनुसार बसवजन्म सोहळा निवडक महिलांच्या उपस्थितीत पार पडला.ज्यामध्ये शोभा परीट,सुनीता मगदुम,प्रेमिला कुंभार,आक्काताई मगदुम, सुनंदा आवटी आदी महिलांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत हा समारंभ साजरा केला.आणि त्या ह्या ऐतिहासिक सोहळयाच्या साक्षीदार ठरल्या.
याच बरोबर इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक अशा ऑनलाइन हस्ताक्षर आणि निबंध लेखन स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या.ज्यामध्ये आपल्या घरीच बसून जवळजवळ ३० विद्यार्थ्थांनी सहभाग नोंदवला.