कोरोनाला एकजुटीने लढून हरवू : आ.सुधीर गाडगीळ .

  • कोरोनाला एकजुटीने लढून हरवू : आ.सुधीर गाडगीळ .


मतदार संघात सॅनिटायझर, मास्क वाटप .


सांगली, ता. 30 : कोरोनाच्या पार्श्वाभूमीवर सध्या गावोगावी भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत मतदार संघातील गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांना दिलासा विश्वासस देण्याचे काम आमदार सुधीर गाडगीळ करत आहेत. आज त्यांनी माधवनगर, बिसूर, खोतवाडी, वाजेगाव या गावांना भेटी देऊन सरपंच, ग्रामेवक, ग्रामपंचायत सदस्य गावकरी तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांशी संवाद साधून गावातील अडीअडचणी जाणून घेतल्या. सर्वांनी एकत्र प्रयत्न करुन एकजुटीने लढून कोरोनाला हरवू असा विश्वाास दिला. आमदार सुधीर गाडगीळ यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वूभूमीवर सध्या मतदार संघातील गावांमध्ये संपर्क दौरा सुरु केला असून पद्माळे, कर्नाळ, नांद्रे या गावी भेट दिल्यानंतर त्यांनी आज माधवनगर, बिसुर, खोतवाडी व वाजेगाव येथे भेट दिली. यावेळी भारतीय जनता पार्टी व आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि जंतूनाशक फवारणीचे औषध वाटप करण्यात आले. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन गावाच्या आरोग्याची माहिती घेतली तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची भेट घेऊन सर्व गावातल्या नागरिकांची तपासणी व आरोग्याची काळजी घेण्यास आवाहन केले तसेच आपली  स्वत:चीही काळजी घ्या असे त्यांना सांगितले. आमदार गाडगीळ म्हणाले, कोरोनाचे संकट जगभर आहे. जगातील 177 देशात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नियोजनामुळे भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने होण्यास प्रतिबंध घातला गेला आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझर व साबणाने  हात स्वच्छ धुणे याचबरोबर आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवल्यास कोरोनाचा संसर्ग टाळण्यात यश येईल. आपण सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाचा प्रतिकार करुन कोरोनाला हरवू असा विश्वासस त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ  युवा मंचाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले व आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, पंचायत समितीचे उपसभापती राहुल सकळे, माजी उपसभापती विक्रम पाटील, माधवनगरचे सरपंच अनिल पाटील, उपसरपंच पिंटू बागल, बाळासाहेब मगदूम, देवा जाधव, महेश साळुंखे, राजू घाडगे, शोभाताई चव्हाण, करिष्मा बेपारी, जयश्री पिसे, निलेश हिंगमिरे, तसेच बिसुरच्या सरपंच सौ. लीलावती पाटील, उपसरपंच रामचंद्र पाटील, सागर पाटील, महेश पाटील, महादेव पाटील, उज्वला पाटील, सतीश निळकंठ, किसन पाटील, पोलीस पाटील सतीश पाटील, खोतवाडीचे सरपंच संजय सूर्यवंशी, उपसरपंच मंजुषा निकम, नाना मुळीक, विठ्ठल मुळीक, संतोष निकम, ग्रामसेवक सुहास कुंभार, वाजेगावच्या सरपंच सौ. जयश्री कदम, उपसरपंच सौ. संयोगिता खराडे, अनिल पाटणकर, शंकर पाटणकर, दिगंबर कदम,  आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचे विश्वजीत पाटील, कृष्णा राठोड, धनेश कातागडे, आबासाहेब  जाधव, श्रीधर जाधव आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते