सांगली - हातावरचे पोट असलेल्या गरजू कुटुंबांचे उत्पन्नाचें साधन बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरज भासत आहे ती अन्नधान्याची आणि हीच अडचण लक्षात घेता ,तसेेेेच आपण समाज बांधवांचे काही देन लागतो, ह्याच उद्देशाने अवनी फाऊंडेशन, सांगली. यांच्या मार्फत गरजू लोकांना त्यांची दिनचर्या चालवणे करिता त्यांना धान्याचे किट वाटप करण्यात आले.
ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेऊन. मिठा पासून तेल - तांदूळ पर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेऊन त्यांना किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी उद्योजक श्री सचिन शहा , मा.मदन भाऊ युवा मंच चे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे , अवनी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप जाधव, उपाध्यक्ष अभिजीत तवटे ,कपिल चव्हाण कपिल वराळे ,संदीप पाटील , विनोद कांबळे ,अमोल डांगे, संतोष कलगुटगी, सुरज डांगे उपस्थित होते.