सांगलीत महानगरपालिका क्षेत्रात एक जण कोरोना पॉझिटिव्ह .

सांगली -  येथील विजयनगर येथील आणखी एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सदर व्यक्तीला न्युमोनिया झाल्याने ती उपचार घेत होती. दि. १७ एप्रिल पासून ही व्यक्ती कोविड हॉस्पिटल मिरज सिव्हिल येथे उपचाराखाली आहे. संपर्क आलेल्यांची छाननी करण्यात येत असून प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
विजयनगर भागातील एका बँकेत काम करणाऱ्या ४७ वर्षीय  व्यक्तीचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह  आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटूंबातील ५ जणांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित आकडा २७ वर गेला आहे.
लक्षणांवरून त्यांना मिरजेत रुग्णालयात दि.१७ रोजी दाखल केले होते. त्यांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीवर मिरजेत अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या घरातील आणखी तीन व्यक्तींना मिरजेत आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. विजयनगर परिसर प्रशासनाने सील केला आले. दरम्यान कोरोना सांगलीत दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.