वाळवा तालुक्यात आणखी दोघांना कोरोना ची लागण.

वाळवा तालुक्यात आणखी दोघांना कोरोना ची लागण.इस्लामपूर (सांगली) : वाळवा तालुक्‍यातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. कासेगाव आणि कामेरी या गावचे हे दोघे रुग्ण आहेत. हे दोघेही कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आहेत. इस्लामपूर शहर सोडून आता वाळवा तालुक्‍यातील गावांमध्ये रुग्णांना लागण झाल्याने धास्ती निर्माण झाली आहे. 
आज दुपारी या दोघांना लागण झाल्याचे समजताच तालुका आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ ही गावे सील करत रुग्णांशी संबंधित लोकांना क्वारंटाईन केले. कामेरी व कासेगाव या गावातील जवळपास 35 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ते ज्या परिसरात राहतात त्या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सात जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे, त्यापैकीच हे दोघे आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले.