फिनॉलेक्स पाईपकडून मनपाला 1 हजार जीवनावश्यक साहित्याचे किट

फिनॉलेक्स पाईपकडून मनपाला 1 हजार जीवनावश्यक साहित्याचे किट.


सांगली : फिनॉलेक्स पाईप कंपनीकडून सांगली महापालिकेला दिव्यांग आणि गरजू लोकांसाठी 1 हजार जीवनावश्यक साहित्याचे किट प्रदान केले.
   आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत कंपनीच्या प्रतिनिधींनी 1 हजार किट मनपाकडे जमा केले. या किटमध्ये एका कुटुंबाला 15 दिवस पुरेल इतका धाण्यसाठा उपलब्ध असून मनपा क्षेत्रातील गरजू आणि दिव्यांग कुटुंबांना या किटचे वाटप करण्यात आले.