जिल्ह्यातील 1 हजार 334 उद्योजकांचे ऑनलाईन अर्ज. पालकमंत्री -सतेज पाटील

जिल्ह्यातील 1 हजार 334 उद्योजकांचे ऑनलाईन अर्ज.4 हजार 166 कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात 261 उद्योग सुरु
  पालकमंत्री सतेज पाटील


कोल्हापूर, दि. 28 : आजअखेर जिल्ह्यातील 1 हजार 334 उद्योजकांनी ऑनलाईन अर्ज केले असून त्यापैकी 667 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 4 हजार 166 कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात 261 जणांनी आपले उद्योग सुरु केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.*
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग व्यवसायला परवानगी देण्याचं धोरण राज्य शासनाने घेतलं आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील उद्योजकांना लवकरात लवकर कारखाने सुरु करावेत, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील 1 हजार 334 कारखानदारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. 667 जणांना परवानगी देण्यात आली आहे. यापैकी 261 कारखानदारांनी 4 हजार 166 कामगारांच्या सहायाने आपले कारखाने सुरु केले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो. 
 जिल्हा प्रशासन म्हणून आमचं सर्व सहकार्य राहणार आहे. अजुनही कारखानदारांनी पुढे येवून कारखाने लवकरात लवकर सुरु करावेत त्यामाध्यमातून अर्थकारणाचे चक्र फिरले पाहिजे. या संकटात कामगाराला त्याचा रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त कारखानदारांनी पुढाकार घ्यावा. प्रशासन म्हणून सर्व प्रकारचे सहकार्य त्यांना राहील, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.