श्री स्वामी समर्थांचा प्रसाद रद्द करून गरजूना वाटला सहा हजार किलो भाजीपाला.

श्री स्वामी समर्थांचा प्रसाद रद्द करून गरजूना वाटला सहा हजार किलो भाजीपाला.


सांगलीत गजानन हुलवाने मित्र परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम.


सांगली  - प्रतिवर्षी प्रमाणे येणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचा प्रसाद लॉगडाऊनमुळे रद्द करीत त्या ऐवजी 1500 गरजू कुटुंबांना तब्बल सहा हजार किलो भाजीपाला वाटण्यात आला आहे. खनभाग धनगर गल्लीचे सामाजिक कार्यकर्ते गजानन हुलवाने आणि मित्र परिवाराने गरजूंना भाजीपाला वाटप केला.
    सांगलीत लॉगडाऊनमुळे भाजीपाला महाग झाला आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना भाजीपाला खाणे महागाचे झाले आहे. त्यातच लॉगडाऊनमुळे प्रतिवर्षी येणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनी भक्तांसाठी केला जाणारा प्रसाद गजानन हुलवाने यांनी रद्द करीत त्या ऐवजी गरजवंत 1500 कुटुंबांना प्रत्येकी 4 किलो प्रमाणे भाजीपाला वाटप करण्यात आला. यावेळी खणभाग, गोसावी गल्ली, धनगर गल्ली, आदी भागातील 1500 कुटुंबांना गजानन हुलवाने यांनी प्रत्येकी 4 किलो प्रमाणे सहा हजार किलो भाजीपाला वाटप केला. याबद्दल नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले. यावेळी गजानन हुलवाने यांच्यासमवेत सुरज चोपडे , सुहास हुलवाणे , सुशांत हजारे , रोहित दुधाळ, राहुल दुधाळ , गणेश शिंदे , नागेश माळी, प्रसाद सरडगी , शुभम रूपनर , संजय शिरगे , लक्ष्मण जाधव, युवराज जाधव , अमर दानोळे , यशवंत हजारे , गणेश दानोळे , राजु घाडगे , किशोर शेळके , शिवाजी घाडगे , अरुण जाधव , सुशांत आरगे , सुशांत पुजारी , विक्रम हुलवाणे , तेजस पालखे , सुनील पालखे , विनायक चोपडे , सनि चोपडे आदी उपस्थित होते.