नुकसान झाले आहे त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी - शरद पवार

नुकसान झाले आहे त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी - शरद पवाररत्नागिरी (दापोली)  - नुकसान झालेल्या विभागाची पाहणी केली असता संपूर्ण यंत्रणा सगळ्याच ठिकाणी पोहोचली नाही. त्यामुळे अजूनही प्राथमिक माहिती आपल्याकडे आली असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यात फळबागा, शेती, घरे याची नुकसान झाले आहे. याचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे जे नुकसान झाले आहे त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दापोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आंबा, नारळ, सुपारी या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई देताना पुढील ७ - ८ वर्षाचा विचार करून द्यायला हवी असेही शरद पवार म्हणाले. 


ष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज काही शेतकऱ्यांनी काढले आहे. आता हे कर्ज फेडण्याची क्षमता सद्या तरी दिसत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली सविस्तर माहिती सरपंच किवा नगरसेवकांना द्यावी. या बँकांच्या प्रमुखांची बैठक घेऊन काही सवलत मिळावी याबद्दलचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.