सांगली महापालिकेचा कॉरंटाईन पॅटर्न : रुग्णालच बनवले इन्स्टिट्यूशनल कोरटाईन सेंटर.




  • सांगली महापालिकेचा कॉरंटाईन पॅटर्न : रुग्णालयच बनवले इन्स्टिट्यूशनल कोरटाईन सेंटर. 

  • आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त स्मृती पाटील यांची संकल्पना : सांगली मनपाचा पॅटर्न राज्यभर.


       





सांगली : कोरोनामुळे जग दूर चालले आहे. त्यातच एखादा   सापडला तर त्याच्याशी संबंधित लोकांना शासनाच्या संस्था कोरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते मात्र या निमित्ताने सांगली महापालिकेने केलेला करंटाइन पॅटर्न सध्या चांगलाच चर्चेत आहे.  मिरजेत एका  रुग्णालयालाच महापालिका प्रशासनाने इन्स्टिट्यूशनल कोरटाईन सेंटर बनवत त्यामध्ये त्याच रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, वैद्यकीय स्टाफला करंटाईन केले आहे. अशा प्रकारे कॉरंटाईन करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग मानला जात आहे.  मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त स्मृती पाटील यांची हि संकल्पना असून सांगली मनपाचा हा कॉरंटाईन पॅटर्न राज्यभर राबविण्याची आवश्यकता आहे. 

    सांगली महापालिकेकडून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुल तसेच लठ्ठे पॉलिटेक्निक या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये आत्तापर्यंत अनेक जणांना कॉरंटाईन करून त्यांना सोडण्यात आले आहे. याठिकाणी सर्व सेवा सुविधाही देण्यात आल्या आहेत. मनपा क्षेत्रात कुठेही रुग्ण सापडला तर त्याच्या संपर्कांतील लोकांना या ठिकाणी कॉरंटाईन केले जाते. 

यापूर्वीच्या केसेसमध्ये एका रुग्णामागे साधारण २० किंवा २५ लोकांना कॉरंटाईन करण्याची वेळ येत होती मात्र मिरजेतील एका प्रसिद्ध डॉक्टरलाच कोरोना झाल्यामुळे त्या डॉक्टरच्या रुग्णालयातील सर्वानाच कॉरंटाईन करण्याचे मोठे आव्हान मनपा यंत्रणेसमोर निर्माण झाले होते. त्यामुळे या रुग्णालयातील १०१ जणांना कोठे कॉरंटाईन करायचा याबाबत विचारविनिमय सुरु असतानाच आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त स्मृती पाटील यांनी १०१ लोकांना स्थलांतरित करणे अशक्य असल्याने या सर्वाना आहे त्याच रुग्णालायच्या इमारतीत आहे त्याच ठिकाणी इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे या रुग्णालयालाच इन्स्टिट्यूशनल करंटाईन सेंटर बनवत  रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, वैद्यकीय स्टाफला तेथेच करंटाईन केले आहे. मनपा प्रशासनाच्या या निर्णयामुळॆ या ठिकाणचे १०१ संपर्कांतील लोकांना कोठेही न हलवता त्याच इमारतीमध्ये कॉरंटाईन करण्यात यश आले. त्यामुळे त्यांचे स्थलांतर तसेच त्यांच्यासाठी नव्याने जाग शोधणे या अडचणी दूर झाल्या.  मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त स्मृती पाटील यांनी हि संकल्पना राबवित यंत्रणेवर पडणारा ताण कमी केला. सांगली महापालिकेच्या या नव्या कॉरंटाईन सेंटरच्या संकल्पनेमुळे कॉरंटाईन सेंटरचा नवा पॅटर्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने करंटाईन सेंटर सुरु झाली तर नक्कीच प्रशासनावरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.