राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या 21 व्या वर्धापनदिनाच्या  निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.


 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या 21 व्या वर्धापनदिनाच्या  निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

 

सांगली - आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या 21 व्या वर्धापनदिनाच्या  निमित्त या कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा पडल्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले असल्याने रक्ताची अत्यंत गरज असल्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने वर्धापनदिनानिमित्त्य सांगली शहरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले, यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा ज्योती आदाटे यांनी पहिलेच  रक्तदान करून शिबीराची सुरूवात केली. आणि अन्य महिलांना रक्तदान करणेसाठी प्रोत्साहीत केले यानंतर सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज व युवक जिल्हा शहर अध्यक्ष राहुल पवार यांचे हस्ते रक्तदाता सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, माजी महापौर मैनुदीन बागवान,शहर जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी विनया पाठक, तसेच स्वाती पारधी ,संगिता हारगे, राधिका हारगे, प्रियांका तुपलोंडे, राणी कदम, वंदना चंदनशिवे, अनिता पांगम, आयेशा शेख, जसबीर कौर, आशा पाटील, आयुब बारगीर, विशाल हिप्परकर, संध्या ऐवळे, योगेन्द्र थोरात, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.