मा नगरसेविका ज्योती आदाटे आणि जितेंद्र जैन यांचेमार्फत परप्रांतीयमजुरांना धान्य-शिधा वाटप

सांगली - कोरोनाच्या महामारीत अनेक परप्रांतीय मजुरांची अवस्था बेहाल झाल्याचे लक्षात येताच, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा आणि माजी नगरसेविका ज्योती आदाटे  यांनी हनुमान नगर आणि पोळमळ्यामधील परप्रांतीय मजुरांना त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून जितेंद्र जैन यांच्याशी  संपर्क साधून मदत देण्याची विनंती केली, जैन त्यांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून,श्रमजीवी,कष्टकरी जनतेचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून  जवळपास 125 लोकांना पुरेल इतकी धान्य -शिधा स्वरुपात मदत करून या महामारीत आलेल्या संकटाला तोंड देण्यास बळ दिले. यावेळी  प्रियांका तुपलोंडे, राणी कदम, आशादेवी पासवान, ह्या उपस्थित होत्या .