सांगलीतील बाजारपेठा सुरू करण्याचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन
सांगलीतील बाजारपेठा सुरू करण्याचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन.

 

सांगली, ता. ७ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेले दिड महिना शहरात लॉक डाऊन तसेच संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठ बंद आहेत त्यामुळे या बाजारपेठाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसेच नागरिकांची ही अडचण झाले आहे सांगली आता ऑरेंज झोन मध्ये आल्यामुळे प्रशासनाने एक आड एक दिवस दुकाने उघडी ठेवण्याचे नियोजन करून प्रमुख बाजारपेठा सुरू कराव्यात असे आवाहन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना केले आहे. शहरातील बाजारपेठ सुरू कराव्यात यासाठी व्यापारी प्रयत्न करत आहेत महापुरानंतर सहाच महिन्यात कोरोनाचे संकटामुळे गेले दीड महिना व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे व्यापारी अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्यालाही दुकाने उघडण्याचे परवानगी द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. आमदार गाडगीळ यांनी शहरातील बाजारपेठा बंद असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांचा उदरनिर्वाह चालणे अवघड असल्याची वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना स्पष्ट केली. सहाच महिन्यापूर्वी आलेल्या महापुराने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते  नुकत्याच कुठे बाजारपेठा सुरू होत होत्या तोवर कोरोनाचे संकट आल्यामुळे पुन्हा बाजारपेठ बंद ठेवायची वेळ आली. त्यामुळे शहराची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. सांगलीचा समावेश ऑरेंज झोन मध्ये झाला असल्याने प्रशासनाने या मेनरोड कापड पेठ गणपती पेठ आदी प्रमुख बाजारपेठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना केली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये  सामाजिक अंतर ठेवून प्रशासनाने दिलेल्या नियम अटीनुसार याची दक्षता घेण्यासाठी बाजारपेठेतील दुकाने एक आड एक दिवस सुरू करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी सूचनाही त्यांनी दिल्या यावर दोन दिवसात याबाबत  नियोजन करून बाजारपेठ सुरू करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना दिली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे शरदभाई शहा, अरुण दांडेकर, राजेश शहा आदी व्यापारी उपस्थित होते