जलप्रलय अनुषंगाने कोल्हापूर विमानतळाची भारतीय तटरक्षक दलाकडून पाहणी .

कोल्हापूर - गत वर्षी आलेल्या महापुराच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या पावसाळ्यातील दक्षता जलप्रलयातील बचावाची पूर्वतयारीची आज भारतीय तट रक्षक दलाच्या गोवा येथील पथकाने पाहणी करुन समाधान व्यक्त केले, अशी माहिती विमानतळ प्राधिकरण संचालक कमल कटारिया यांनी दिली. गोवा येथील पथकाचे कमांडंट अमित कोरगावकर आणि कमांडंट अशोक यादव यांनी आय सी जी चेतकच्या माध्यमातून कोल्हापूर, रत्नागिरी परिसराची आणि कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली. विमानतळावरील एएनएस, एटीएम / एटीएस, रनवे, टॅक्सी वे, एप्रॉन, रिफाईलिंग सुविधा, एमईटी सुविधा, ई व एम सेवा व इतर सर्व सेवा आगामी पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध असल्याचे दिसून आले. आगामी पावसाळ्यात कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर विमानतळ पूर्णपणे सक्षम असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.