शासनाच्या नियमांचे पालन करूनच रमजान महिन्यातील कार्यक्रम करा.. स.पो.नि. कैलास कोडग.
शासनाच्या नियमांचे पालन करूनच रमजान महिन्यातील कार्यक्रम करा..

स.पो.नि. कैलास कोडग.

 

भिलवडी - भिलवडी परिसरामधील मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यांमध्ये शासनाच्या नियमांचे पालन करून, रमजान महिन्यांमध्ये होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरीच साजरे करावेत. कोणीही एकत्रित येऊन नमाज पठण करू नये.असे आवाहन भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी केले.

 

      भिलवडी तालुका पलुस येथे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर भिलवडी पोलीस व मुस्लिम बांधव यांच्यामध्ये भिलवडी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत बैठक संपन्न यावेळी  भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना शासनाच्या आदेशाविषयी मार्गदर्शन केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मुस्लिम समाजातील पवित्र रमजान महिना येत्या २५ तारखेस सुरू होत आहे. या काळात  शासन नियमांचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे. या पवित्र महिन्यात पहाटे लवकर सहरी केली जाते तर दिवसातून ५ वेळेस नमाज पठण तसेच मुस्लिम धर्मातील पवित्र धर्मग्रंथ कुरान पठन करण्यात येते. तर संध्याकाळी रोजा इफ्तार केला जातो व नंतर तराबीचे एकत्र नमाज अदा केली जाते परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व  गोष्टींना निर्बंध घालुन घरीच राहून सहरी,नमाज,पवित्र ग्रंथ कुरान ची तीलवत व रोजा इफ्तार करण्याचे तसेच या कालावधीमध्ये नमाज पठण करताना कोणीही मशिदीमध्ये अथवा घराच्या टेरेस वरती एकत्रित येऊन नमाज पठण करू नये. शासनाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी केली आहे. मुस्लिम बांधवांनी ही शासनाच्या आदेशाचे पालन करूनच, रमजान महिन्यातील सर्व कार्यक्रम पार पाडले जातील असे आश्वासन दिले.यावेळी भिलवडी अंकलखोप माळवाडीसह परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते.