वसंतदादा सेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यामातून महापालिकेस शववाहिका प्रदान.


सांगली  - कोविड विषाणू संसर्गाच्‍या पार्श्‍वभूमीवर वसंतदादा सेवा प्रतिष्‍ठान, सांगली यांच्‍या माध्‍यमातून व सांगली जिल्‍ह्यातील दक्षिण भारतात असलेल्‍या गलाई बंधू यांच्‍या मदतीने सांगली महापालिकेस माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील व विशाल पाटील यांच्‍या हस्‍ते आयुक्‍त नितीन कापडणीस यांना शववाहिकेची किल्‍ली प्रदान करण्‍यात आली.यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अद्यावत व शंभर टक्‍के निर्जंतुकीकरण शववाहिकेची पाहणी करुन  वसंतदादा सेवा प्रतिष्‍ठानच्‍या कार्याचे कौतुक केले व म्हणाले अशा महामारीच्‍या परिस्थितीमध्‍ये दानशूर व्‍यक्‍ती, स्‍वयंसेवी संस्‍था यांनी पुढे येवून प्रशासनास सहकार्य करावे. तरच या महामारीवर आपण सर्वजण एकजुट होवून विजय मिळवू शकतो.  मिरज सांगली सिव्‍हील हॉस्‍पीटलच्‍या माजी वैद्यकीय अधिष्‍ठाता डॉ. पल्‍लवी सापळे यांच्‍या संकल्‍पनेतून व परिवहनाच्‍या नियमानुसार सांगली जिल्‍हयाचे आर.टी.ओ. विलास कांबळे यांनी या शववाहिकेची निर्मीती करण्‍यास मंजूरी दिली. सांगली जिल्‍ह्यामध्‍ये कोरोना विषाणूच्‍या संसर्गामधून अनेक रूग्‍णांची संख्‍या वाढून मृत्‍यूचे सुध्‍दा प्रमाण वाढलेले आहे. विशेष करुन महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना रूग्‍णांची संख्‍या जास्‍त  आहे. प्रशासनावर याबाबत प्रचंड तणाव निर्माण होत आहे. कोरोना अथवा इतर संसर्गजन्‍य रोगामधून एखाद्या रूग्‍णाचा मृत्यू झाल्‍यास खाजगी रूग्‍णवाहिका मयत व्‍यक्‍ती घेण्‍यास टाळाटाळ करतात अथवा मोठ्या भाड्याची अपेक्षा करतात. हे भाडे सर्वसामान्‍य जनतेला परवडणारे नाही. म्‍हणून वसंतदादा सेवा प्रतिष्‍ठान सांगली व दक्षिण भारतात असलेल्‍या गलाई बांधवांकडून महापालिकेस शव वाहिका देण्‍याचे निश्चित केले. शववाहिके बाबत नागरीकांनी आरोग्‍य विभाग महापालिका सांगली यांचेशी संपर्क साधण्‍याचे आवाहन यावेळी करण्‍यात आले.


यावेळी अधिष्‍ठाता डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. सुनिल आंबोळे, लायन्‍स नॅब हॉस्‍पीटल मिरज राजेंद्रप्रसाद जगदाळे, विजय पवार, दिनेश जाधव, संजय कुलकर्णी, भिमराव चौगुले इत्‍यादी प्रमुख मान्‍यवर उपस्थित होते.